बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा…

0

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असातान स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगा तपासल्या-

लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावेळीचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.