‘द साबरमती रिपोर्ट’चा ट्रेलर लॉन्च होताच अभिनेता पोहचला गोध्रा स्थानकावर, विक्रांतच्या भेटीने सगळेच झाले आवाक्

0

गोध्रा रेल्वे स्थानकावर काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. साबरमती एक्सप्रेसच्या डब्यांना गोध्रा स्थानकावर अचानक आग लागली होती. त्यानंतर अनेक वर्ष या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत होते. याच सगळ्यावर भाष्य करणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे.

या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर अभिनेता विक्रांत मेसीने नुकतीच गोध्रा स्थानकाला भेट दिली. साबरमतीच्या घटनेमध्ये गोध्रा स्थानकाला भेट देणं हा विक्रांतसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. बालाजी मोशन पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड प्रस्तुत विभाग, एक विकीर फिल्म्स प्रॉडक्शन, विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा अभिनीत ‘द साबरमती रिपोर्ट’, धीरज सरना दिग्दर्शित आणि शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन निर्मित आणि अंशुल मोहन, झी स्टुडिओज द्वारे जगभरातील प्रसिद्ध. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अनेकांनी गमावले होते प्राण…

27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीच्या प्रकरणी दोन चौकशी आयोग नेमण्यात आले होते.

‘सिनेमाचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही’

दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच हा सिनेमा प्रदर्शित केला जातोय. त्यावरही एकता कपूरला या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकताने म्हटलं की, सिनेमाच्या रिलीजची तारीख बऱ्याच काळापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टीचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही. या सिनेमात कोणत्याही प्रकारच्या धर्माचं कनेक्शन नसल्याचं एकताने स्पष्ट केलं आहे. यावर एकताने म्हटलं की, मी हिंदू आहे, याचाच अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही कारण मी हिंदू आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन