माझा प्रामाणिक सल्ला दादांनी नागरिकांची दिशाभूल करू नये: चंद्रकांत मोकाटे

0

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यानी बाणेर येथील एका जाहीर सभेत बालभारती ते पौड फाटा रस्त्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन नागरिकांनाची दिशाभूल केली वास्तविक त्यांनी असे चुकीची माहिती देऊ नये हा माझा प्रामाणिकपणे सल्ला आहे असे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज सांगितलं

श्री पाटील यांनी नुकतेच बाणेर येथील एका जाहीर सभेत भाषण करताना सांगितलं की बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामास आपण पालकमंत्री असताना स्थगिती दिली. यासंदर्भात बोलताना श्री चंद्रकांत मोकाटे सांगितलं की मा चंद्रकांतदादा जनतेची दिशाभूल करतात. वास्तविक या रस्त्याच्या कामास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर चंद्रकांतदादा पाटील या रस्त्याच्या कामास स्थगिती कशी देऊ असा सवाल श्री मोकाटे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना केला आहे. ही पुणेकर आणि कोथरूडकर जनतेची घोर फसवणूक आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

श्री मोकाटे म्हणाले की आम्ही पर्यावरणवादी आहोत तत्कालीन पर्यावरणमंत्री मा आदित्य ठाकरे यांचं उपस्थितीत आम्ही बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या पाहणी केली केली आणि या रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. आम्ही कायम पर्यावरणवादी बरोबर आहे. श्री मोकाटे यांनी पाषाण परिसरात नागरिकांशी बातचीत केली