शिवडीपासून धुळ्यापर्यंत… कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर

0

विधानसभा निवडणुकीसाठी आता काही दिवस शिल्लक असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दुसरी उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही ओळखीच्या नावांना संधी मिळाली असून, शिवडीच्या मतदारसंघावरही तोडगा निघाल्याचं स्पष्ट होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यादी प्रसिद्ध करताना देण्यात आली. याआधी शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

पहिल्या यादीमागोमागच चर्चा आणि बैठकांच्या सत्रांनंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

मतदारसंघनिहाय उमेदवार खालीलप्रमाणे…

धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज)- राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनौल महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम-सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर

दरम्यान, ठाकरेंच्या पक्षाची यादी जाहीर होण्याआधीच मविआचा नवा फॉर्म्युला समोर आला होता. मविआतील 3 पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा मिळणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरातांनी दिल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता उर्वरित जागांवर मविआतील पक्ष कोणाला विधानसभेचं तिकीट देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?