खडकवासला ‘हॅट्रिक’ आमदारांच्या ‘चौकारा’साठी हालचाली वाढल्या; कार्यकर्त्यांचे दौरे वाढले बांधणीही सुरू?

0
1

खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील मूळ भाजप विचारसरणीच्या उमेदवाराचा सलग ‘हॅट्रिक’ विजय साकार करणारा एकमेव मतदार संघ! मितभाषी आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून भीमराव तापकीर यांची असलेली ओळख आणि या जीवावर  काल निवडणूक आचारसंहितेचा शंखनाद झाला आणि अनुभवाने प्रगल्भ असलेल्या आमदाराने मतदारसंघातील हालचाली वाढवल्या. मतदार संघाची संरचना आणि केलेल्या कामाच्या जोरावर पहिल्या यादीमध्येच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे नाव प्रसिद्ध होणार असल्याचे संकेत मिळतात जनतेचा आमदार ही बिरूदावली आमदार भीमराव तापकीर यांचे निष्ठावान कार्यकर्ते कामालाही लागले. प्रभागानुसार कार्यकर्त्यांची बांधणी करण्यात आली असून नाव जाहीर होतात सुसज्ज टीमच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात ‘विजय चौकार’ साध्यचा शंखनाद करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या अगोदर पुणे शहरामध्ये सर्वात जास्त चर्चेत गेलेला मतदार संघ म्हणून खडकवासला मतदारसंघाची गणना केली जात होती. मुळात मितभाषी असलेल्या भीमराव तापकीर यांनी कोणत्याही इच्छुक उमेदवाराला व्यक्तिगत टार्गेट न करता हा त्याचा लोकशाहीचा मार्ग आहे अशी सामंजस्याची भूमिका घेत प्रसंगी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना हजेरीही लावली. एखाद्या पदाची इच्छा अपेक्षा हा मनुष्य धर्म असून हे माझेच कार्यकर्ते त्यांच्या प्रयत्नांना अडकाठी न बनता काम करत राहत कायम शांत बसण्याची अनुभवाची प्रगल्भता आमदार भीमराव तापकीर यांनी दाखवली परंतु या सामंजस्यांच्या भूमिकेला काही लोकांनी संधीचं नाव देत आपल्या मनीषा पूर्ण करण्याचे काम केले. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार अन भारतीय जनता पक्षाची जडणघडण या दुहेरी वैचारिक ठेवणीच्या जोरावर निवडणुकीचा शंखनाद होताच यंत्रणा सक्रिय करत आमदार भीमराव तापकीर यांनी प्रगल्भतेनुसार मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

निवडणुकीत विजय झाल्यापासून पुन्हा निवडणूक लागेपर्यंत कायम जनसेवा हीच माझी ताकद अशी भूमिका घेत आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विचार रुजवले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये घराघरांमध्ये महायुतीकडून दिलेल्या उमेदवाराला विरोध होत असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि प्रचार शैलीवर बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य देणारा एकमेव मतदारसंघ खडकवासलाच ठरला. भारतीय जनता पक्षाचे विचार या मतदारसंघात किती भरीव आहेत याची जाणीव प्रक्षश्रेष्ठींना करून दिली. जनसेवेत असताना कोणताही स्वार्थ न पाहिल्यास जनता आपल्या विचारांचा स्वीकार करते ही पक्की बांधणी गेली 15 वर्षे खडकवासला मतदारसंघांमध्ये काम करत असताना आमदार भीमराव तापकीर यांनी केली आणि त्याचं फलित पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वेळा अटीतटीच्या लढती होऊनही कायम भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या मतदारसंघांमध्ये विजयी झाला.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये कायमच इच्छुक जोडगोळींकडूनच हेतू साध्य करण्यासाठी ‘अँटी इन्कमबन्सी’ची चर्चा चघळली परंतु जनसेवेत कायम तल्लीन असलेल्या विद्यमान आमदारांनी याकडे डोळेझाक केली अन संधीसाधू लोकांनी नव्या चर्चांना सुरुवात केली असली तरी भारतीय जनता पक्षासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुन्हा विजयी करण्यात संकल्प विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून केला आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या सर्व्हेमध्ये सकारात्मक कौल आलेल्या आमदारांची नावे जाहीर होणार असल्याने खडकवासला मतदारसंघांमध्ये सध्या लगबग सुरू झाली आहे. पूर्वीच ‘हॅट्रिक’ साध्य केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून उमेदवारी जाहीर होतात संपूर्ण मतदारसंघात आनंद उत्सव साजरा करण्याची तयारी कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीमध्ये ज्या शिवशक्ती आणि भीमशक्तीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच विचारांची साधना करत गेली पंधरा वर्षे आमदार भीमराव तापकीर यांनी या विचारांचा खडकवासला मतदारसंघांमध्ये वटवृक्ष बनवला आहे. सर्व जातीय समीकरणे एकत्र ठेवण्याचे काम आमदार भीमराव तापकीर यांना शक्य झाले असल्यामुळे गेली चार वर्ष आमदार भीमराव तापकीर यांचा वाढदिवस आठवडाभर सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला जात असतो. या जनआशीर्वादाच्या जीवावर विजयी चौकार ही शक्य असल्याची विनम्र भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.