हायकोर्टाचा आदेश आणि सदावर्तेंची बिग बॉसच्या घरातून एक्झिट 

0

Bigg Boss 18 :  ‘सूरज चव्हाण’ने मराठी बिग बॉस सीजन 5 च्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं. मराठी बिग बॉसचा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हिंदी बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु झाला आहे.या बिग बॉसच्या सीजनमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंची धडाकेबाज एन्ट्रीने तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांची स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री झाली तेव्हा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

सध्या ‘बीबी’च्या घरात गुणरत्न सदावर्ते प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी सिजनचा पहिला आठवा देखील चांगलाच गाजवला आहे. मात्र, अश्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.सध्या सोशल मीडियावर सध्या गुणरत्न सदावर्ते यांची एक्झिट झाली असल्याच्या चर्चा आहेत. अनेक पोस्टही या संदर्भात व्हायरल होताय. त्यामध्ये एका केसच्या संदर्भात सदावर्ते हे बिग बॉसच्या घराबाहेर पडले असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

पण सदावर्ते नेमकं कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, हे कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून मनोरंजन करणारे गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉसच्या घरात दिसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमकं कारण पाहा….

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आज संपला. यावेळी मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

इतर वकिलांकडून हायकोर्टाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

आता युक्तिवादाची वेळ आली तर तेच गायब झालेत, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. सध्या मराठा आरक्षणासंदर्भातील हायकोर्टातील पूर्णपिठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

गुणरत्न सदावर्ते पुन्हा ‘बीबी’च्या घरात जातील का?

मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी सदावर्तेंना सध्या घरातून बाहेर पडावं लागलं असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे ही सुनावणी झाल्यास गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात येऊ शकतात, असंही म्हटलं जातंय.