खपाच्या विक्रमाने या कार हिरो, पण सेफ्टीबाबतीत झिरोच आहेत, ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टचा हाती

0

सणासुदीच्या हंगाम सुरु असल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या एकाहून एक सरस कार ग्राहकांसाठी लॉंच करीत आहेत. वाहन निर्माता कंपनी वेगवेगळ्या फिचर्सच्या कार बाजारात आणत आहेत. परंतू सेफ्टी रेटींगमध्ये मात्र या लोकप्रिय सर्वाधिक खपाच्या कार फेल ठरल्या आहेत. अलिकडे अनेक कारच्या क्रॅश टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात या कारना सुरक्षेसंदर्भात खराब टेस्टींग मिळूनही इंडियन मार्केटमध्ये मात्र याच कारना पसंद केले जात आहे.

विक्रीच्या बाबतीत टॉप रेटींग परंतू सेफ्टीत कमी रेटींग मिळालेल्या कार….

Maruti Ertiga -मारुतीची सर्वात पॉप्युलर 7 सिटर कार एर्टीगा हीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये केवळ 1 – स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. त्याशिवाय Adult Occupant Protection साठी Maruti Ertiga हीला 34 पैकी 23.63 मिळाले आहेत. तसेच चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनच्या टेस्टमध्ये 49 पैकी केवळ 19.40 पॉईंट मिळाले आहेत. मारुती एर्टीगा 7 सिटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 8 लाख 69 हजार रुपये आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

Maruti WagonR -देशातील सर्वात लोकप्रिय दुसरी कार मारुती वॅगनआर असून तिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये केवळ केवळ 1 – स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. Adult Occupant Protection साठी 34 पैकी 19.69 पॉईंट मिळाले आहेत. चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 3.40 पॉईंट मिळाले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 55 हजार रुपये आहे.

Maruti S-Presso – यात तिसरी कार Maruti S-Presso असून हीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये केवळ 1 स्टार रेटींग मिळाली आहे. या कारला एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 34 पैकी 20.03 पॉईंट मिळाले आहेत. तर चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 49 पैकी 3.52 पॉइंट मिळाले आहेत.या कारची किंमत 4 लाख 27 हजार रुपये इतकी आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

Nexa Ignis – या क्रमवारीत चौथी कार नेक्सा डीलरशिपची एंट्री ले्व्हल कार इग्निस आहे. तिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. एडल्ट ऑक्युपेंटसाठी या कारला 34 पैकी 16.48 पॉईंट मिळाले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 84 हजार रुपये आहे.