भोर–वेल्हा–मुळशी या विधानसभा मतदारसंघ संग्राम थोपटे यांचं नातं काय? गेली दोन वर्ष साडी, आणि देवदर्शनाच्या ट्रिपा करून या मतदारसंघात आपण विजय मिळवू शकणार या अविर्भावात वागणाऱ्या सर्व स्पर्धकांना भोर–वेल्हा–मुळशी ‘लकी ड्रॉ आणि वाटप’ माननीयांनी इंट्री केली असून गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या निमित्ताने सरंजाम, रेल्वेगाडीने यात्रा अन् घरोघरी जाऊन साडी वाटप करणाऱ्या सर्व स्पर्धकांना नॉक-आउट करणारा पंच दिला असून थेट 4 ‘चारचाकी’ गाडीच लकी ड्रॉ मध्ये वाटण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांचा वारसा चालू ठेवत विनम्रतेने भोर वेल्हा आणि मुळशी या तीनही मतदार संघात 12 चारचाकी गाड्यांचा लकी ड्रॉ हा आता मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.






आजपर्यंत भाजप, शिवसेनेनं अनेक प्रयत्न करुनही काँग्रेसच याभागात विजयी राहिली. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये एक हाती प्रचाराची सूत्रे ताब्यात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा (४३९०५) चे मताधिक्य देऊन तालुक्यावरली पकड सिद्ध केली होती परंतु मुळशी तालुक्यातून लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेच्या काही ‘बाळबोध’ हालचाली सुरू झाल्या अन तालुक्यांमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस गिरट्या घालत असताना या नव्या पाखरांचे पंख छाटण्यासाठी दमदार भोर वेल्हा अन् मुळशी ‘पॅटर्न’ आणला असून विधानसभा निवडणुक ‘संग्राम’ आम्हीच मारणार या आविर्भावात वागणाऱ्या सर्व स्पर्धकांना (भाजपा शिवसेनेतील नव्या पाखरांना)….. इतनी जल्दी भी क्या है; अभी तो मैने स्टार्ट किया| हा संदेश दिला असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
भोर मतदारसंघांची निर्मिती झाल्यापासून पारंपारिक विरोधक कुलदीप कोंडे,माजी आमदार शरद ढमाले, बाळासाहेब चांदेरे, माजी आमदार पुत्र विक्रम खुटवड, रणजीत शिवतारे आणि भाजपच्या वतीने माजी नगरसेवक किरण दगडेपाटील यांनी थोपटेंच्या वर्चस्वला आव्हान देण्यासाठी पूर्णपणे तयारी केली होती; परंतु संग्राम थोपटे यांनी विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह तीन ‘मास्टरस्ट्रोक’ तालुका निहाय दिल्याने या मतदारसंघातील आगामी प्रचाराची दिशा आज बदलली आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्यात यंदा विधानसभा निवडणुक ‘रंजक’ झाली असून वारं फिरलयं!ची वल्गना करत फिरणाऱ्या सर्व स्पर्धकांना हा संकेत दिला असून मुळशी तालुक्यामध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कसा प्रतिसाद मिळतो यावरती तालुक्याचे गणित अवलंबून राहणार आहे. संग्राम थोपटे यांच्यासाठी मुळशी तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका दिल्याने काम करत असल्याचा संदेश जातीने हजर राहून सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. आगामी काळामध्ये या मतदारसंघांमध्ये आचारसंहितेच्या अगोदर असंख्य घडामोडी घडणार आहेतच.
भोर–वेल्हा–मुळशी मुळातच पुणे शहरालगत हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या तिन्ही तालुक्यांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणे अपेक्षित असताना विरोधकांनीच यामध्ये ‘वाटपशास्त्र’ आणल्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मूळ मुद्दे बाजूला सरून फक्त आणि फक्त आरोप प्रत्यारोप आणि वाटप यावरतीच निवडणूक लढली जाणार का? हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. थोपटे यांच्या वर्चस्वाला विरोधकांनी सुरूग लावण्यास सुरुवात केली परंतु ट्रिपा लकी ड्रॉ अन साड्या वाटप असे किरकोळ कार्यक्रम राबवल्यामुळे निवडणुकीचा ‘संग्राम’ रखडलेला गुंजवणीचा प्रस्ताव, शहरी पट्ट्याकडे झालेलं दुर्लक्ष या महत्त्वाच्या विषयापासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











