बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही अरबाजला निक्कीची आठवण; गर्लफ्रेंडने उचललं मोठं पाऊल

0

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांच्या जोड्या जमल्या, तर काहींच्या जोड्या तुटल्याही. ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांची जोडी तुफान चर्चेत राहिली. घराबाहेरही सोशल मीडियावर या जोडीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरबाज बाहेर पडला. तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती. आता घरातून बाहेर आल्यानंतर अरबाजसुद्धा निक्कीच्या आठवणीतच रमल्याचं दिसून येत आहे. अरबाजच्या इन्स्टाग्रामवर निक्कीचा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर आता बिग बॉसच्या घराबाहेर असलेल्या अरबाजच्या गर्लफ्रेंडने मोठं पाऊल उचललं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बिग बॉसच्या घरात निक्कीला अरबाजचा मोठा आधार होता. त्यामुळे अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर निक्की घरात एकटी पडली आहे. अरबाजच्या आठवणीत तीसुद्धा रडत आहे. ‘बिग बॉसमधील अरबाज आणि निक्की यांच्यातील नातं खूप खास होतं. अरबाजने बिग बॉसचं घर सोडल्यानंतर निक्कीची अवस्था पाहणं खूप वेदनादायी आहे. खंबीर राहा निक्की. तुला आपल्यासाठी ट्रॉफी जिंकावी लागेल. अरबाजच्या आर्मीचा निक्कीला पूर्ण पाठिंबा आहे’, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय.

एकीकडे निक्कीच्या आठवणीत अरबाज रमला असताना दुसरीकडे त्याची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने थेट इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अरबाज बिग बॉसच्या घरात असताना लिझा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सतत काही ना काही पोस्ट करत होती. मागच्या काही पोस्टमध्ये तिने अरबाजसोबतचं नातंही जाहीर केलं होतं. आता अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर लिझाने लिहिलंय, ‘तुमच्यासोबतचा माझा प्रवास कदाचित इथपर्यंतच होता. तुम्हा सर्वांकडून मला खूप प्रेमळ आठवणी मिळाल्या आहेत. मी नेहमीच तुम्हा सर्वांना लक्षात ठेवीन आणि तुम्हीसुद्धा मला विसरू नका. गुड बाय इन्स्टाग्राम फॅमिली.’

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

निक्कीसोबतच्या अफेअरच्या चर्चांना वैतागून काही दिवसांपूर्वी लिझाने अरबाजसोबत ब्रेकअप करण्याचा इशारा दिला होता. इतकंच नव्हे तर तिने निक्कीलाही पोस्टमधून सुनावलं होतं. या सर्व नाट्यानंतर लिझाने सोशल मीडियावर अरबाजसोबतच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. ‘तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. तुला मी कधीच एकटं सोडणार नाही,’ असं तिने लिहिलं होतं. आता लिझाने इन्स्टाग्राम सोडत असल्याची पोस्ट लिहिल्याने पुन्हा एकदा अरबाज-निक्कीचं नातं चर्चेत आलं आहे.