पुण्यातून सामाजिक दुहीची जातीयवादी मोठी बातमी समोर येतेय. पुणे लोकसभेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी होण्यासाठी सुरू असलेल्या अभिषेकावेळी मातंग समाजाचा भक्त प्रत्यक्ष हजर राहिल्यामुळे तथाकथित हिंदुत्ववादी समुदायाच्या वतीने मातंग समाजाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु ज्या व्यक्तीसाठी (केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ) हा प्रताप संबंधित आरोपींनी केला त्या व्यक्तीला मात्र या गुन्ह्यातून ‘नामनिराळ’ करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. राजेंद्र शिळीमकर, मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर, महेश शिळीमकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु ज्या व्यक्तीसाठी हा रुद्राभिषेक करून हिंदुत्ववादी संघटनांकडून पूर्ण मंदिरावरती ताबा घेण्यात आला अन ‘मनुस्मृति’प्रमाणे दलितांना वागणूक दिली याबद्दल कठोर कारवाई होणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
शंकर महाराज मठात रूद्राभिषेक करण्याकरीता मज्जाव करून, मारहाण केल्याप्रकरणी चेतन आरडे यांचं उपोषण सुरू होतं. उपोषणानंतर पोलिसांकडून शिळीमकर कारवाई करण्यात आलीय. शंकर महाराज मठात रूद्राभिषेक करण्याकरीता मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर अश्लील जातीय वाचक शिवीगाळ आणि बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या पाच दिवसापासून चेतन आरडे हे पुणे स्टेशन समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले आहे.
चेतन आरडे हे मातंग समाजातील असून तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहे. २० जून २०२४ रोजी सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील आले होते. मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांना ही आत जायचं होतं. परंतु, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतनला मारहाण केली.
याप्रकरणी चेतन यांनी ११२ क्रमांक डायल करून पोलिसांत तक्रार केली, परंतु तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले नव्हते. यावेळी चेतन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता. तेव्हा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रकारे जबाब आणि तक्रार नोंदवून घेतली नाही.
त्यामुळे पीडित हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले आहे. यावेळी मारहाण आणि शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून जीवितास धोका आहे. त्यांच्यावरती अनुसूचित जाती कायदा १९८९ सुधारित २०१६ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. मला न्याय द्यावा, असं आरडे यांनी लेखी पत्र दिलं होतं. पत्राची दखल घेत गुन्हा दाखल केला होता.