नेपाळची राजधानी काठमांडूत सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. या विमानात 19 प्रवासी होते त्यापैकी 15 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या विमानाने पेट घेतल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भाती व्यक्त होत आहे. हे विमान काठमांडू वरुन पोखरा येते जात होते. या टेकऑफ दरम्यान हे विमान धावपट्टीवर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले.’
बुधवारी सकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना सौर्य एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून टायर फुटल्याने घसरल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमान काठमांडूहू पोखरासाठी रवाना होत असताना सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे.
विमानाचे पायलट बचावले
या विमानात दोन क्रू सदस्य आणि 17 तंत्रज्ञ होते. ते या विमानाला देखभाल दुरुस्तीसाठी पोखरा शहरात घेऊन जात होते असे विमानतळ सुरक्षा प्रमुख अर्जुन चंद ठाकुरी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले आहे, पायलट मनीष शांक्य यांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नेपाळी लष्कराच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच ते विमान धावपट्टीवर कोसळल्याने त्याला मोठी आग लागली, परंतु आपत्कालीन यंत्रणेने ही आग त्वरित विझवली आणि तातडीने बचावकार्य सुरु केले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.