महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात रिक्षा चालक मालक यांना पन्नास रुपये प्रतिदिन दंड लेट पासिंगसाठी आकारण्यात आलेला होता तो स्थगित करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली याबद्दल पुणे शहर रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने दादांचा रिक्षाची प्रतिकृती व सन्मान पत्र देऊन दादांचे अभिनंदन करण्यात आले.






या प्रसंगी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा रिक्षा फेडरेशन पुणे शहराचे अध्यक्ष आनंद उर्फ बंडूशेठ तांबे शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माननीय अशोकराव साळेकर ,सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप भालेराव, मनसे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री किशोर चिंतामणी, रिक्षा टेम्पो मेन्स युनियनचे कार्याध्यक्ष प्रकाश झाडे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे कार्याध्यक्ष माननीय विलास केमसे ,कृती समितीचे समन्वयक तुषार पवार ,श्री स्वामी समर्थ रिक्षा संघटना धायरी सुनील वाणी , विजय कदम, जयंत कवडे, नवनाथ शिळीमकर बाळासाहेब धोंगडे ,ज्ञानेश्वर जगदाळे, समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ अपूर्वा स्वप्निल तांबे सदस्य राजू गाडेकर विजय शेळके व अनेक पदाधिकारी व सभासद यांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अजितदादांनी या दंड माफ करण्याबाबतची सर्व पार्श्वभूमी पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले आणि आणि अतिशय व्यस्त कार्यक्रमात सुद्धा सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल पुणे शहर रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने दादांचे मनापासून आभार मानण्यात आले.











