जयंत पाटील विधान परिषदेला कशामुळे पडले? शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

0

मागच्या आठवड्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार होते. त्यात मविआ सोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पडले. जयंत पाटील का पडले? मविआमधून दगाफटका झाला का? यावरुन बरेच तर्क-वितर्क सुरु आहेत. आता स्वत: शरद पवार यांनी या बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “जयंत पाटील यांच्याबाबत एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता. माझ्या पक्षाची 12 मते होती. आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असं वाटलं. त्याला कारण होतं” असं शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

“लोकसभेच्या निवडणुकीत तिघे एकत्र लढलो. ती लढत असताना सीपीआय, सीपीएम, शेकाप सोबत होते. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या. ते देण्याच्या स्थितीत नव्हतो. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि मी एकत्र बसलो. तेव्हा त्यांना सांगितलं की, डाव्यांना आता काही देऊ शकत नाही. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू. सर्वांनी मान्य केलं. तिघे एकत्र लढलो. लोकसभेत यश मिळालं. मनात होतं की संधी आली तर जागांचा विचार करावा” असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी सांगितलं काय चुकलं?

“काँग्रेसची मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेनेकडे थोडी जास्त होती, पण पुरेशी नव्हती. त्यांनी उमेदवार दिला. त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण त्यात मतभिन्नता होती. काँग्रेसकडे 37, आमच्याकडे 12 आणि शिवसेनेकडे 16 मते होती. काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. निवडून येण्यासाठी सर्व मते तुम्ही घ्या. दोन नंबरची मते 50 टक्के मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्या. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला असं हवं होतं. माझं गणित होतं. आमचे निवडून आले असते. हे गणित मान्य झालं नाही. त्यामुळे शेकापचे पाटील पडले. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे पडले” असं शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार