भररस्त्यात स्कूटरवरून जाताना शिवसेना नेत्यावर निहंग शिखांकडून हल्ला; तलवारीने केले वार

0

पंजाबमधील लुधियाना येथे निहंग शिखांनी शिवसेना टकसाली नेत्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात शिवसेना टकसाली नेता गंभीर जखमी झाले आहेत. निहंग शिखांनी भर रस्त्यात शिवसेना टकसाली नेत्यावर तलवारीने अनेक वेळा वार केले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना टकसाली नेते संदीप थापर हे शुक्रवारी सकाळी संवाद ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. ते स्कूटरवरून जात असताना अचानक आलेले निहंग शीख यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने संदीप याच्यांवर धारदार तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली.

संदीप थापर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर संदीप हे रस्त्यावरच पडले. यानंतर निहंग शीख स्कूटरवरून पळून गेले. घटना घडली त्यावेळी शेजारी अनेक लोक उभे होते. मात्र, आरोपीच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. निहंग शीख तिथून पळून गेल्यावर संदीप थापर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संदीप थापर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

शिवसेना नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निहंग शिखांच्या वेशात आलेले हल्लेखोर शिवसेना टकसाली नेते संदीप थापर उर्फ गोरा यांच्यावर हल्ला करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संदीप थापर यांच्यासोबत नेहमी बंदूकधारी असतात. मात्र हल्ल्यावेळी तो मूक प्रेक्षक बनला होता. तेथे उपस्थित लोकांनी शिवसेना नेत्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

शिवसेना टकसालीचे नेते संदीप थापर आपल्या भाषणात खलिस्तानविरोधात बोलतात. या कारणावरून त्यांना सतत धमक्या येत आहेत. याआधीही जेव्हा त्यांना सतत धमक्या येत होत्या तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी तैनात करण्यात आले होते.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात