सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बाल लग्नावर मुकेश खन्नाचे भाष्य म्हणाले, …या गोष्टीला हिंदू मुस्लिम ॲगल देऊ नका

0

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी बॉलिवूड अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे तब्बल 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, लग्नामध्ये वडिलांचा हात पकडून सही करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले होते. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामध्ये आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी मोठे भाष्य केले आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, प्रेमामध्ये कोणताही धर्म नसतो. या गोष्टीला हिंदू मुस्लिम ॲगल देऊ नका. सोनाक्षीने जे केले त्यामध्ये तिने अचानकपणे त्याच्यासोबत लग्न केले नाहीये.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

सोनाक्षीने 7 ते 8 वर्षांच्या रिलेशननंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग यामध्ये हिंदू मुस्लिम काहीच राहत नाही. जिहाद अशावेळी होते, ज्यावेळी एका छोट्या मुलीला फूस लावून एका वर्षाच्या आतमध्ये लग्न केले जाते. त्यावेळी गडबड होते. ही गोष्ट पूर्णपणे वेगळी असल्याचे देखील मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.

मुळात म्हणजे इथे दोघेपण कलाकार आहेत. इथे हिंदू मुस्लिम होत नाही. आमच्या काळात देखील लोकांनी अशी लग्न केली आहेत आणि विशेष म्हणजे ते आजही आनंदी आहेत. मुकेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे खूप जास्त जवळचे मित्र आहेत. पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल बोलताना आता मुकेश खन्ना हे दिसले आहेत.सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा कायमच दिसते. मोठ्या संपत्तीची मालकीन देखील सोनाक्षी सिन्हा ही आहे.