सालाबाद प्रमाणे याही वर्षी कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात वारकरी मेळावा संपन्न झाला ,दिनांक ३० जून व एक जुलै रोजी वारकऱ्यांचे वास्तव्य होम कॉलनी सभागृहात करण्यात आले होते भव्य दिव्य असा मंडपात् वारकऱ्यांच्या सोबत् कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व परिसरातील नागरिकांनी तसेच महिला पुरुष तरुण मुलं मुली या सर्वांनी फुगडी झिम्मा कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.






या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री विजय नायकल साहेब वरिष्ठ आरोग्य निरीक्षक माननीय श्री साहेब आरोग्य निरीक्षक माननीय श्री राजेश आहेर साहेब आरोग्य विभागाचे प्रमुख राहुल परदेशी साहेब त्यांची सर्व सहकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री माणिक शेठ दुधाने, नगरसेविका वृषालीताई चौधरी, पत्रकार माऊली म्हेत्रे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभेच्या उपाध्यक्ष मीनाताई मोरे, मंदाकिनी वन्साळे, वैशाली दिघे, शिवसैनिक जगदीश दिघे ,वैशाली जगदीश दिघे, रत्ना कट्ट्याचे संस्थापक सदस्य नामदेव राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष राजू चव्हाण, संघटक सचिव राजू गाडेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला व योगा ग्रुप चे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन माननीय श्री रामराव कदम, अशोक कदम, सोपान कावळे, कल्याण कदम व नामदेव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमरीत्या केले त्याचप्रमाणे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वतीने सुद्धा वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार मोफत देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन आनंद उर्फ बंडूशेठ तांबे व दिंडी चालक हरिभक्त परायण माननीय श्री विश्वंभर घुमरे महाराज यांनी मानले.










