विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 5 उमेदवारांची यादी जाहीर केलीये. त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं त्यांची आमदारकी निश्चित झाली. मात्र महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिल्यानं आता 1 उमेदवार कोणाचा पडणार ? याकडे नजरा आहेत. महायुतीच्या वाट्याला 9 जागा येत असून भाजपच्या कोट्यातून सर्व पाचही उमेदवार भाजपनं जाहीर केले. ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे. पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा भाजपनं आपल्या कोट्यातून संधी दिली आहे.
विशेष म्हणजे शरद पवार भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांनी या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये कोणतीही रिस्क न घेता आपल्या कोट्यानुसार उमेदवार जाहीर केले आहेत. तर पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्वतंत्र उमेदवार (निष्ठावान शिवसैनिक मिलिंद नार्वेकर) उभा केल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे. तर जयंत पाटील (शेकाप) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसेना आणि अन्य अपक्ष या आमदारांची मते कोणाकडे जाणार ही खरी कसोटी आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतांचा कोटा 23 अगोदरच जाहीर केला आहे त्यामुळे नीलम गोर्हे व भावना गवळी यांच्यापैकी मिलिंद नार्वेकर कोणाची विकेट घेतात ही खरी कसोटी या निवडणुकीमध्ये लागणार आहे. जयंत पाटील (शेकाप) मतांची जुळवाजुळव कशी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही 2-2 उमेदवार दिले जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेकडून निलम गोऱ्हे आणि भावना गवळींना संधी मिळेल हे निश्चित झालं आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. शिवाजीराव गर्जेंच्या नावावरुन रोहित पवारांनी अगोदरच कागदपत्र गायब करण्याची (गद्दारी)ची जोरदार टीका केली आहे.
महाविकास आघाडीचा विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावर 11 जागेसाठी 12 उमेदवार झालेत. त्यामुळं निवडणूक होणार हे निश्चित. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने प्रचंड उसंडी घेत विजयी झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. तर विधानसभेतील संख्याबळ पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपले दोन्ही उमेदवार विजयी होतील याचा विश्वास आहे. आता कोणाचा उमेदवार पडणार हे पाहावं लागेल.