मुंबई ठाकरेंचीच पुन्हा स्पष्ट; लोकसभेत 4 पैकी 3 जागी विजयानंतर मुंबई पदवीधर, शिक्षक पुन्हा विक्रमी विजय

0

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीआधी देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. या निवडणुकीनंतर राज्यात 26 जूनला विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये कोकण विभाग पदवीधर, मुंबई पदवीधर, मुबंई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांचा निकाल आता समोर आला आहे. या दोन्ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही शिलेदार या मतदारसंघात विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचं गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता आहे. पण आता शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली. ठाकरेंनी मविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे 4 उमेदवार मुंबईतील लोकसभांच्या जागांवर उभे केले होते. या चार पैकी तीन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर चौथे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला. यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

मुंबई शिक्षक मतदारसंघात अभ्यंकर यांचा 4 हजार 83 मते मितांनी विजयी

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय?

ॲड.अनिल परब, शिवसेना :- 44 हजार 784 (विजयी)
किरण शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26

महाराष्ट्रात लढत कुणाकुणामध्ये?

कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस) – निरंजन डावखरे विजयी

मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट) – अनिल परब विजयी

मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती) – ज. मो. अभ्यंकर विजयी

नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)