पदाचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करा ; अन्यथा आमरण उपोषण

0
20

पुणे : सध्याच्या युगात सुधारित जीवनशैली प्रदान करण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला ज्ञानाचा वापर करून चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास शिक्षण मदत करते. खरे तर शिक्षण क्षेत्र सामाजिक परिवर्तनाचे केंद्रबिंदू असताना या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भ्रष्ट व अनैतिक कामे करून गालबोट लावले आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे याठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयात उपसंचालक (प्रशासन) श्रीराम पानझाडे यांनी आपल्या आजवरच्या कार्यकाळात मनमानी कारभार करत अधिकार पदाचा गैरवापर केला आहे. उपसंचालक (प्रशासन) श्रीराम पानझाडे यांची सखोल चौकशी करत निलंबन करावे अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा छात्र शिक्षक कृती संस्था उपाध्यक्ष अंगद भोसले यांनी दिला आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

याविषयी सविस्तर माहिती देताना छात्र शिक्षक कृती संस्था उपाध्यक्ष अंगद भोसले यांनी सांगितले की, उपसंचालक (प्रशासन) श्रीराम पानझाडे यांनी आपल्या आजवरच्या कार्यकाळात अधिकार पदाचा गैरवापर आर्थिक लाभासाठीच केला असल्याचे त्यांच्या अनेक कृत्यातून दिसून आले आहे. अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळेची भ्रष्ट व निमयबाहय कामे नियमित करून देण्यासाठी लाखो रूपये घेवून मध्यस्थी केलेली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा, जि. जळगांव संचलित संस्थांची नियमबाहय कामांची चौकशी केल्यास अनेक बाबी समोर येतील.

बुलढाणा येथे शिक्षणाधिकारी असताना निमयबाहय मान्यता मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांचे रिटपिटीशन नंबर ६९७१/२०१९ मधील आदेशात बाल शिक्षण मंडळ संचलित माई हार्षे प्राथमिक शाळा,अमरावती या शिक्षिका नम्रता मेटकर यांचे लाखो रूपयांचे वेतनाची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ) अमरावती असताना तत्कालीन विभागीय उपसंचालक श्रीराम पानझाडे यांनी श्रीमती मेटकर यांच्या वेतनाचा भार शासनावर टाकला तसेच अनेक शाळांना वैयक्तिक मान्यता ( उच्च माध्यमिक) देत अनेक नियमबाहय कामे करून आर्थिक लाभार्थी झाले आहेत. अमरावती येथे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना लाखो रूपये भ्रष्ट मार्गाने कमविलेले आहेत.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

श्रीराम पानझाडे हे सध्या ज्या पदावर कार्यरत आहेत त्या पदाचा गैरवापर करत शिक्षण आयुक्तच्या संगनमताने राज्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची लॉबी तयार करुन अर्थिक रॅकेट चालवत आहेत. तक्रारी असणाऱ्या गणपत मोरे, औंदुबर उकिर्डे, मीना शेंडकर अशा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही भ्रष्ट अधिकारी अथवा कर्मचाऱ्याच्या प्रकरणामध्ये तडजोड केली जाते व प्रकरणे निकाली काढली जातात अथवा प्रलंबित ठेवले जातात. तक्रार असणाऱ्या कोणत्याही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली जात नाही. उलट त्यांचेकडून आर्थिक लाभ मिळवून प्रशस्तीपत्रक देत पाठीशी घालण्याचे शिक्षण क्षेत्रात मोठे रॅकेट्स जोमात सुरु आहे. शिक्षण सम्राट, राजकारणी आणि शिक्षण प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे लागेबांधे कसे आहेत ? याचा प्रत्यक्ष पुरावा असणाऱ्या श्रीराम पानझाडे याची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यपाल, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय सचिव, मुख्य आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा छात्र शिक्षक कृती संस्था उपाध्यक्ष अंगद भोसले यांनी दिला आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली