पुण्यात गोळ्या बिस्किटांसारखे ड्रग्स, एमडी गांजा; …उडता पंजाब होऊन देणार नाही: पतित पावन संघटनेचे आंदोलन

0
1

सध्याच्या पुण्यात झालेल्या घटना पाहता आज आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पतित पावन संघटनेने आंदोलन केले. कोयता गॅंग, नाईट लाईफ, गुटखा गांजा विक्री, हिट अँड रन, विस्कळीत वाहतूक हे सर्व

पाहता राज्यकर्ता विवस्त्र आहे हे समोर आले आहे. पुणेकर नागरिकांना ह्या सर्व घटनांचा वैताग आला असून पुणे शहराच्या अस्मितेसाठी पतित पावन संघटना कटीबद्ध आहे. जर पुण्यात पब अवैध धंदे बंद झाले नाही तर पतित पावन संघटना पुण्याच्या संस्कृती वाचवण्यासाठी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून या तरुण पिढीला प्रशासन नक्की काय देत आहे असा प्रश्न आम्हा सर्वांना आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

सांस्कृतिक पुणे शहरांत गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळामध्ये रात्री 10 नंतर सक्तीची साऊंडबंदी लावली जाते; परंतु या पब विकृतीला नक्की कोणाचा आश्रय आहे? गणेश मंडळांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवले जातात परंतु याच पब विकृतीसाठी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बांधले जातात? पुण्यातील सर्व राजकीय पक्षांनी पुण्याच्या अस्मितेसाठी एकत्र यावे व या ड्रग्सरहित पुण्यात पुणेकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही पतित पावन संघटने तर्फे करण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे श्री शिवाजीराव चव्हाण, श्री दिनेश भिलारे, श्री स्वप्नील नाईक, श्री प्रसाद वाईकर, श्री संतोष शेंडगे, श्री गुरु कोळी, श्री प्रवीण झवर, श्री अक्षय जम्बुरे, श्री अशोक परदेशी, श्री राजाभाऊ कारखूड, श्री यादव पुजारी, श्री सुरज पोटे,श्री विजय क्षीरसागर, श्री राहुल शिंदे, श्री स्वप्निल आंग्रे, श्री योगेश करपे, श्री शिवराज निवदेकर, श्री आबा पानसरे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर