मनोज जरांगेंनी ठणकावलं ; मराठे OBC तूनच आरक्षण घेणार, ते ही 50 टक्क्याच्या आत

0

मनोज जरांगे पाटील यांनी आज रुग्णालयात मीडियाशी बोलताना मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. “लोकांच्या लेकराचे मुडदे कसे पडतील? मराठ्याच्या लेकराच्या नरड्याला नख लावायच काम त्याने आुष्यभर केलय” अशा शब्दात छगन भुजबळांवर टीका केली.

“आम्ही सांगितलेल्या व्याख्येप्रमाणेच सग्या सोयऱ्याची अमलबजावणी व्हावी. सगळे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया 13 जुलै आधी करावी. शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी. बॉम्बे गर्व्हमेन्ट गॅजेट, सातारा गर्व्हमेन्ट गॅजेट, जे आमचे ठरलेले विषय, मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्यात” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “13 जुलैच्या आधी मराठ्यांना ओबीसीच्या अंतर्गत तेही 50 टक्क्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील ठामपणे म्हणाले. कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर चर्चा होणार होती. पण ओबीसी आंदोलन सुरु झालं. त्यांनाही सरकारने कॅबिनेटमध्ये चर्चा करणार म्हणून शब्द दिलेला. मराठा-ओबीसीच्या चर्चेत वादळ नको, म्हणून कॅबिनेट कॅन्सल केली का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कॅबिनेट रद्द करण्याच कारण मला माहित नाही. त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, मला माहित नाही”

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

“ओबीसींना आरक्षण असून ते इतके लढतायत. आम्हाला तर आरक्षणच नाही, मग आम्ही किती लढलं पाहिजे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आरक्षण असणारे असे लढायला लागले, तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीने लढतील. माझ्या मराठ्याला आरक्षण नाही. घरात मतभेद असेल तरी ते आम्ही बाजूला ठेवू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “शेतकरी, माथाडी कामगार, रिक्षावाले सगळे मराठे एक होतील. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला असून आम्हाला मिळू नये म्हणून इतके लढताय. मग, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून किती ताकदीने लढू. आता खानदानी मराठे मतभेद सोडून एकत्र येणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘मराठे आरक्षण ओबीसीतूनच घेणार’

“मराठ्यांच्या विरोधात विष ओकायला लागलेत. आमचेही मराठे मतभेद सोडून जातीच्या लेकरासाठी लढतील. आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना मराठे आता उघडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत. घराघरातले मराठे जागे झालेत. मराठे आरक्षण ओबीसीतूनच घेणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘नरड्याला नख लावायच काम त्याने आुष्यभर केलय’

छगन भुजबळांवरही मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. “भुजबळ मराठे आरक्षणाच्या विरोधात कधी नव्हते? लोकांच्या लेकराचे मुडदे कसे पडतील? मराठ्याच्या लेकराच्या नरड्याला नख लावायच काम त्याने आुष्यभर केलय. त्यांच्याकडून अपेक्षा नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता