टाटांचा मेगा प्लॅन, थेट मोबाईल क्षेत्रात उडी घेण्याची तयारी, ही कंपनी घेऊन…

0

देशातील सर्वात विश्वार्ह कंपनी असलेला टाटा समूह नवीन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. सुईपासून विमाने बनवण्यापर्यंत मजल मारणारी ही कंपनी आता स्मार्टफोन उद्योगात उतरणार आहे. एका दशकापूर्वी टाटा समूह मोबाइल नेटवर्क आणि हॅडसेट बनवत होती. परंतु आता स्मार्टफोन बनवणार आहे. त्यासाठी चीनमधील दिग्गज मोबाइल कंपनी वीवो (Vivo) खरेदी करण्याची तयारी टाटाने चालवली आहे. जर हा करार पूर्ण झाला तर या कंपनीत 51 टक्के शेअर टाटा कंपनीचे असणार आहे. त्यामुळे विदेशातील कंपनीचे सर्व नियंत्रण देशातील टाटा समुहाकडे येणार आहे.

स्मार्टफोन बनवणार आणि विक्री करणार

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भारत सरकारने चीनमधील कंपन्यांवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे चीनमधील मोठी कंपनी वीवो आपल्या कंपनीतील भागविक्री विकण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टाटा समुहासोबत त्यांची चर्चा सुरु केली आहे. वीवी टाटा सोबत स्मार्टफोन बनवणार आणि विक्री करणार आहे.

दोन्ही कंपन्यांची प्राथमिक बोलणी पूर्ण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाली आहे. आता वीवो कंपनीच्या मूल्यांकनावर हे प्रकरण आले आहे. टाटाने आपल्याकडून वीवी कंपनीचे मूल्यांकन केले आहे. परंतु वीवोला त्यापेक्षा अधिक मूल्यांकन हवे आहे. टाटा कंपनी या करारासाठी उत्सुक आहे. परंतु अद्याप काहीच निश्चित झाले नाही.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सध्या भारतीय कंपनीकडे वीवो मोबाइल तयार (मॅन्युफॅक्चरिंग) करण्याचे काम आहे. भगवती प्रॉटक्ट (Micromax) वीवोचे मोबाइल बनवत आहे. त्यासाठी या कंपनीने नोएडामधील प्लॅन्टमध्ये भरती सुरु केली आहे. वीवोचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नोएडामधील टेक्‍जोन आयटी पार्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये असणार आहे. त्या ठिकाणी ग्रेटर नोएडामधील 170 एकरवर नवीन युनिट तयार केले जात आहे. त्या युनिटमधून काही दिवसांत उत्पादन सुरु होणार आहे. सध्या टाटाकडून या डिलसंदर्भात काहीच माहिती दिली जात नाही. परंतु हा करार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून वेगाने पावले उचलली गेली आहेत.

भारत सरकारची भूमिका काय?

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

भारत सरकारने या प्रकरणात आपले धोरण स्पष्ट केले आहे. सरकारने म्हटले की, चीनी मोबाईल कंपनीचा 51 टक्के हिस्सा भारतीय कंपनीच्या हातात असावा. तसेच मोबाईल हँडसेटचे उत्पादन आणि वितरण केवळ संयुक्त उपक्रम म्हणून केले जावे. तसेच केंद्र सरकार विवो कंपनीचीही चौकशी करत आहे. या कंपनीवर कर लपवल्याचा आणि मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.