लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ४ जून रोजी कुणाला बहुमत मिळणार, देशात कुणाची सत्ता येईल? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण, त्यापूर्वीच निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासक आपले अंदाज मांडत आहेत. प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी आपले अंतिम अंदाज मांडले असून, आता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी निकाल कसा लागणार, याबद्दलचे विश्लेषण केले आहे.






राजदीप सरदेसाई यांचे मत?
पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यामते यावेळी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाजपला मोठा झटका बसेल. या दोन राज्यामध्ये भाजपला अनेक जागांवर फटका बसेल. त्यांच्या जागा कमी होतील. २०१९ मध्ये जशी कामगिरी भाजपने या दोन राज्यांमध्ये होती, तशी ती यावेळी असणार नाही. हरयाणा, बिहारमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रासारखीच स्थिती असेल. येथेही भाजपच्या जागा घटतील, असा अंदाज सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेबद्दल निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादवांचे मत
योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांचा अंतिम अंदाज मांडला आहे. त्यांच्यामते भाजपला 240-260 जागा, तर एनडीएतील घटक पक्षांना 35-45 जागा मिळेल. काँग्रेसला 85-100, तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांना 120-135 जागा मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.
प्रशांत किशोर यांचा हा अंदाज?
राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनीही निवडणुकीबद्दल त्यांचा अंदाज मांडला आहे. प्रशांत किशोर यांच्यामते भाजप 2019 मध्ये मिळवलं, तितकेच यश या निवडणुकीत मिळवेल. त्यांना 370 जागा मिळणार नाही.
उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी पुनर्जिवित होणार?
सरदेसाई यांच्ंयामते उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही आश्चर्यचकित करणारे निकाल येतील. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी पुनर्जिवित होताना दिसत आहे. समाजवादी पक्षाची व्होट बँक वाढताना दिसत आहे, पण त्याचा निकालात किती परिणाम होईल, हे सांगणे कठीण आहे.
काँग्रेस या राज्यात वाढणार
कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यात काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकात काँग्रेस भाजपचे जास्त नुकसान करेल, असे दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.










