पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना चॅलेंज देतो,आयुक्तांचं बेधडक आव्हान, कारवाईचा घटनाक्रम सविस्तर सांगितला!

0

पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये रधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आलीये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीये. या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पाोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितशे कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसंच पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचं बेधडक आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आमच्यवर कोणाचाही दबाव नसून कडक कारवाई करणे हीच आमची भूमिका आहे, हे देखील अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. अमितेश कुमार म्हणाले, रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा. मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून यामध्ये 304 कलमांतर्गत सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यांचे वय हे 16 वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यानुसार प्रौढ म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मद्य पिऊन रहादारीच्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे . जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना 14 दिवसासाठी रिमांड होममध्ये पाठवण्यात यावे. मात्र कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आमच्यावर कोणाचाही दबाव नाही : पुणे पोलीस आयुक्त

या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पाोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, असे विचारच अमितेश कुमार म्हणाले, पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे . ज्य दोन निष्पाप जीवांचा बळी गेलाय त्यांना न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर कधी नव्हताच .

संजय राऊतांच्या मागणी पुणे पोलिस आयुक्त म्हणाले…..

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अपघातप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त नेमकी कुणाला मदत करतायत? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. तसेच पुण्याला लाभलेले आयुक्त म्हणजे पुण्यासाठी कलंक, त्यांना बडतर्फ करायला हवं अशी मागणी राऊतांनी केली. याविषयी बोलताना अमितेश कुमार म्हणाले, मी त्यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. परंतु आम्ही स्पष्ट नमुद करतो की, या संदर्भात कोणत्याही लिगल एक्सपर्ट जर असेल तर त्यांनी यावे आम्हाला सांगावे की, या पेक्षा कडक कारवाई करु शकतो तर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. पहिल्या दिवसापासून आमची भूमीका ही कडकच राहिली आहे.