बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं दीर्घ आजारानं सोमवारी निधन झालं. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा सरकार असताना कायम भाजपची हिररीने भूमिका मांडण्याचे काम सुशील कुमार मोदी यांनी केलं.नितीश कुमार यांच्याबरोबर सत्तेत असू किंवा विरोधात भारतीय जनता पक्षाचा बिहारमध्ये एक वेगळा अजेंडा ठेवण्याचे काम मोदी यांच्याकडून करण्यात आलेले आहे.






बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन ही बातमी दिली आहे.
"Former Bihar Deputy CM Sushil Kumar Modi passes away ", tweets Vijay Kumar Sinha, Bihar Dy CM pic.twitter.com/ylPyOVMgyC
— ANI (@ANI) May 13, 2024
सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.










