‘या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे’, मनोज जरांगे आक्रमक

0

गेल्या वर्षाच्या मध्यांतरानंतर आणि या वर्षाच्या सुरुवातीला मराठा आंदोलनाच्या वादळाने सरकार हादरवले. मुंबईच्या वेशीत, वाशीमध्ये मराठा आंदोलनाचा काही आश्वासनानंतर सांगता झाली. त्यानंतर सरकारावर फसवणुकीचा आरोप करत जरांगे पाटील यांनी उपोषण केले. काही दिवसानंतर ते मागे घेतले. लोकसभा निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. पण काल रात्री बीडमधील आष्टीजवळील एका सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठ्यांच्या भीतीने पाच टप्प्यात मतदान

अंबोरा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यांना हात घातला. मराठा ताकतीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की चांगल्या चांगल्याने गुडघे टेकावे लागत आहे.मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टक्क्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि.दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मोदी सध्या गोदड्या घेऊन मुक्कामी

भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता, आमच्या माय लेकीचे डोके फोडले.मोदी सध्या गोदड्या घेवून मुक्कामी आहेत. मी कोणालाही निवडून द्या म्हटलो नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर तोंडसूख घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला, हे त्यांनी ठासून सांगितले.

भाजप नेत्यांवर टीकेचे बाण

यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसह देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी भाषणातून लक्ष केले. कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील यांना तेरे नाम, खेकड्याची ओलाद असे ते म्हणाले. मी कधी नादी लागलो रे तुझ्या अशी टीका त्यांनी केली. फडणवीस साहेब तेरे नाम ला समजून सांगा. जामनेरच्या पंधरा रुपयाचा पट्टा घालणाऱ्या लां मी नीट केले आहे, असा टोला त्यांनी हाणला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

असे पाडा की पाच पिढ्य घरी बसल्या पाहिजे

या सभेत जरांगेंच्या एका विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरवली. या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला. जात महत्वाची आहे, तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद ,सरपंच पदाला पाडा. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मोदी इथे मुक्कामी आहे. मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो, असा इशारा पण त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन