पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निधन झाले, तर या देशात कोणीही पंतप्रधान होणार नाही का? मोदी मेले तर १४० कोटी लोकसंख्येमध्ये पंतप्रधानपदाचा कोणीच पात्र उमेदवार नाही का? असा अजब सवाल करत काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले.






बेळगाव जिल्ह्यातील कागवड तालुक्यातील ममदापूर गावात झालेल्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदींचे निधन झाले, तर या देशात पुढे पंतप्रधान होणारच नाहीत का? मोदींचा मृत्यू झाला तर १४० कोटी लोकसंख्येमध्ये पंतप्रधानपदासाठी कोणी पुढे येणार नाही का? असे त्यांनी विचारले.
आजचे तरुण ‘मोदी, मोदी’चा जयघोष करतात. तुम्ही मोदींना घेऊन करणार काय? राज्यातील मतदारांचे म्हणणे आहे की, त्यांना काँग्रेसचे सरकार हवे आहे. पण, केंद्रात मोदी आले पाहिजेत. इथल्या समस्या मोदी येऊन बघणार का? इथे अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी मोदी येणार नाहीत. येथे आम्हीच तुमची समस्या ऐकतो. तीन हजार कोटींच्या विमानात प्रवास करून मोदी चार लाखांचा सूट घालतात. अशा लोकांना घेऊन काय करायचे, असा टोला त्यांनी लगावला.











