”आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा”; रवी किशनच्या कथित मुलीची मागणी

0

काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर नावाच्या एका महिलेने भोजपुरी स्टार आणि भाजपचे उमेदवार रवी किशन हे आपले पती असून आपली 25 वर्षीय मुलगी शिनोवा ही त्यांचीच असल्याचा दावा केला होता. अपर्णा ठाकूर यांनी केलेल्या आरोपानंतर रवी किशन यांच्या पत्नीने अपर्णा आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. आता, शिनोवाने आपले कथित वडील रवी किशन यांनाच आव्हान दिले आहे.

शिनोवाने केली महत्त्वाची मागणी

रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने रवी किशन यांना उद्देशून म्हटले की, जर आमच्या आरोपात काही तथ्य नसेल तर तुम्ही स्वत: समोर येऊन आरोपांना उत्तर का देत नाही? तुम्ही फक्त डीएनए चाचणी करावी अशी मागणी करत आहे. तुम्ही या प्रकरणावर काहीही बोलतही नाही, ना कोणत्या प्रश्नांना उत्तर देत आहात. माझे कुटुंबीय, एक वकील आणि इतकंच नव्हे तर एका पत्रकाराविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

शिनोवाने पुढे म्हटले की, ते माझे वडील आहेत आणि त्यांनी माझा स्वीकार करावा, हे सांगण्याचा मला अधिकार आहे आणि मी आज अचानक सांगत नाहीये. यादरम्यान अनेक गोष्टी घडल्या असल्याचे शिनोवाने म्हटले. पण, त्या घटनांबद्दल फारसं बोलू शकत नाही.

शिनोवा पुढे म्हणाली की, तिला खूप कॉल येत असल्याने तिने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणाली, ‘यावेळी फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जात आहे. आपण सर्वजण मिळून अनेक गोष्टींना तोंड देत आहोत, असेही तिने सांगितले.

प्रकरण काय?

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत रवि किशन यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी या महिलेने स्वत: भाजप खासदाराची पत्नी असल्याचा दावा देखील केला. तसेच त्यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलीला तिचे हक्क द्यायचे असल्याचं देखील या महिलेने म्हटलं आहे. 1996 मध्ये त्यांचं लग्न झाले होते. त्यांच्या लग्नात कुटुंबीय आणि मित्रमंडळी देखील सहभागी झाले असल्याचा दावा अपर्णाने केला होता. दरम्यान रवि किशन यांची मुलगी असल्याचा दावा आपल्या मुलीला तिचे हक्क मिळत नसल्याने पत्रकार परिषद घेत असल्याचं या महिलेने म्हटले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पत्रकार परिषदे दरम्यान अपर्णा ठाकूर हिनं म्हटलं की, जेव्हा आमची मुलगी 15 वर्षांची होती, तेव्हा तिला कळालं की रवि किशन तिचे वडिल आहेत. त्याआधी ती त्यांना काका बोलायची. ते तिच्या वाढदिवसाला घरी देखील यायचे. पण एका वडिलांसारखे ते कधीच तिच्यासोबत नव्हते. मागील चार वर्षांपासून रवि किशन यांनी त्यांच्यासोबत कोणताही संपर्क केला नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.