मुनगंटीवारांचे अतिउत्साह अघोरी वक्तव्यं मोठ्या वाद?; “सख्या भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून एकत्र…”

0

चंद्रपूरच्या प्रचार सभेतील सुधीर मुनगंटीवारांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना ‘सख्ख्या भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून झोपवणारे काँग्रेसवाले’, असे विधान मुनगंटीवार केले. मुनगंटीवारांच्या भाषणाची ही क्लीप व्हायरल होत असून, विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचे बाण डागले जात आहेत.

सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर वणी आर्वी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (९ मार्च) सभा घेतली. याच सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. त्यात त्यांनी केलेल्या विधानाने वाद उभा राहिला आहे.

सुधीर मुनगंटीवार वादग्रस्त विधान… वाद का?

कॉंग्रेसच प्रवक्ते संचिन सावंत मुनगंटीवारांचा हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, “निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. ‘एका भावाला बहिणीबरोबर’ सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच ‘आप’च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेत यांना नोटीस पाठवली.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पुढे सचिन सावंत म्हणतात, “केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल”, असा इशारा त्यांनी दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ते म्हणतात, “जी काही भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली आहे. ती भाषा समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी आहे. भाऊ -बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे, हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का?”

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

“त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हेच जर भाजपचे संस्कार असतील तर या देशाचे काही खरे नाही. जे भाष्य त्यांनी केले आहे त्याबद्दल मुनगंटीवार यांनी तर माफी मागायलाच हवी , त्याचबरोबर ते ज्या पक्षाचे नेतृत्व करतात; ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाने म्हणजेच भाजपनेही देशाची माफी मागायला हवी. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यावर चिखल उडवणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो!”, अशा शब्दात आव्हाडांनी टीका केली आहे.

तमाम माता भगिनींचा अपमान

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुद्धा मुनगंटीवारांचा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, “हा किळसवाणा माणूस जर भारताच्या संसदेत गेला तर हा भारतातील तमाम माता भगिनींचा अपमान असेल! अशा घाण विचाराची माणसं समाजासाठी अतिशय घातक आहे. जनतेला हात जोडून विनंती, ही कीड नष्ट करा.”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

“आपल्या दारुण पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेस पक्षावर अत्यंत हीन दर्जाची टीका करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार आणि भाडोत्री जनता पार्टीचा जाहीर निषेध…”, असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे.

सुधीर मुनगंटीवारांनी काय दिलं स्पष्टीकरण?

1984 साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत, असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही. वंदे मातरम!!!”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.