गडकरींच्या प्रचारात मोठी चुक? कायदे धाब्यावर बसवुन आचारसंहितेचे उल्लंघन; विरोधकांचा आक्रमक पवित्रा!

0

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये, असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भारतीय जनता पक्ष व उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केले होते. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे, हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने 2014 साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे. निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे म्हणाले.लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका” परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपुरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

भाजप नेते नितीन गडकरी यांच्या प्रचाराने काँग्रेस नेते वैफल्यग्रस्त झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मनात येईल तसे आरोप काँग्रेस नेते करत सुटले आहे. नितीन गडकरी यांच्या विजयाचे गणित सुनिश्चित असताना काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळु सरकल्याने आरोप करण्यात येत असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी हे अतिशय सुज्ञ राजकारणी असुन प्रचारात लहान मुलांचा समावेश त्यांच्याद्वारे होणे कदापी शक्य नसल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. देशात नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती देशातील सर्व खासदारांनी केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा देखील समावेश होता. असे असताना नितीन गडकरी यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वावर आरोप करणे हे चुकीचे असुन त्याला कुठलाही आधार नसल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. अतुल लोंढे यांच्या खोट्या आरोपांवर काय प्रतिक्रिया द्यायची असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत