नीता अंबानी यांची रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर, रोहितने सडेतोड दिले उत्तर

0
29

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झालेली आहे. मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्या याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबर 2023 रोजी रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्या याला कर्णधार केले होते. मुंबईच्या सलग तीन सामन्यांत झालेल्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परंतु रोहित शर्मा यांनी ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिले आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

काय म्हटले रोहित शर्माने

मीडिया रिपोर्ट्स नुसार, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला ऑफर दिल्यानंतर रोहितने स्पष्टपणे नकार दिला. तसेच आयपीएलचा हा सीजन संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचे नीता अंबानी यांना सांगितले आहे. यामुळे आयपीएल 2025 (IPL 2025)मध्ये रोहित शर्मा नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माने 3 सामन्यांत 69 धावा केल्या आहेत

रोहित शर्मा याच्यापुढे पर्याय काय

रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा विजेतेपद मिळवले. परंतु यावर्षी रोहित शर्माचे कर्णधारपद अचानक काढून घेण्यात आले. मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुंबई इंडियन्यच्या अनेक समर्थकांनी रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला अनफॉलो केले होते. आता मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर रोहित शर्मापुढे तीन पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद किंवा पंजाब किंग्स संघाकडून रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

आयपीएलमध्ये मुंबई संघाच्या पुढील कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबईचा चौथा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत होणार आहे.