1 एप्रिलपासून अनेक नियम बदलले, LPG पासून EPFO पर्यंत तुमच्यावर परिणाम करणारे निर्णय

0

आज 1 एप्रिल. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आले आहे. तुमच्यावर परिणाम करणारे हे नियम आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहे. या बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे. पाहू या काय, काय झाले बदल…

एलपीजी सिलेंडर स्वस्त

आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहे. या सिलेंडरचे दर 32 रुपये कमी झाले आहे. आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीमध्ये 1764.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 1879.00 रुपये तर मुंबईमध्ये 1717.50 रुपयांना हे सिलेंडर मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात काही बदल करण्यात आला नाही.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ईपीएफओचा नवीन नियम

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर सिस्टम लागू केली आहे. जेव्हा तुम्ही नवीन नोकरीच्या ठिकाणी जातात तेव्हा मॅन्युअल फंड ट्रांसफर करावी लागते. परंतु आता ऑटोमेटीक प्रणालीने हे काम होणार आहे. तुमचा पीएफ बॅलेंस नवीन कंपनीत वर्ग होईल.

नवीन कर प्रणाली

1 एप्रिल 2024 पासून देशात नवीन टॅक्स सिस्टम डिफॉल्ट पर्याय होणार आहे. जर तुम्ही जुनी करप्रणालीचा स्वीकार केला नाही तर तुमचा टॅक्स कॅल्कुलेशन नवीन नियमाप्रमाणे होणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कर प्रणालीत काहीच बदल केला नाही. 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागणार नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पेन्शनसाठी टू फॅक्टर ऑथन्टिकेशन

आजपासून, 1 एप्रिलपासून, PFRDA राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होत आहे. पासवर्डद्वारे सीआरए प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी सिस्टममध्ये टू फॅक्टर ऑथन्टिकेशन लागू केले आहे.

टोयोटाची निवडक वाहने महाग

आजपासून टोयोटा मोटरची काही निवडक वाहने महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 एप्रिलपासून कंपनीने निवडक वाहनांच्या किंमती एक टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली होती.

ई-वाहनांना सबसिडी नाही

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेला सरकार 31 मार्चनंतर वाढवणार नाही. या योजनेची मुदत वाढवण्याच्या वृत्ताचे खंडन करताना अवजड उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन