दादागिरी आत्ता बस्स ‘कम से कम दोन लाख…’ मतांनी विजयीच; भर मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा वाचला

0

गेल्या अनेक दिवसांपासून भूमिका गुलदस्तात ठेवणारे आमदार नीलेश लंके यांनी सुपा (ता. पारनेर) येथे आज मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजप खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता त्यांनी जोरदार हल्ला चढवला. “रावणाचादेखील नाश झाला. अहंकाराचादेखील नाश झाला. तुम्ही कोण?, असे सांगून ‘कम से कम दोन लाख…’ मतांनी निवडून येणारच, असा इशारा खासदार विखे यांना देत लोकसभेला सामोरे जाण्यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला असल्याचे सांगून नीलेश लंके यांनी भर मेळाव्यात राजीनामा वाचून दाखवला. शरद पवार यांना मध्यंतरी आपण दुःख दिले. आता त्यांची भरपाई करण्यासाठी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे नीलेश लंके यांनी जाहीर केले.

पारनेर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार लंके हे अजित पवार यांच्या गटात गेले होते. मात्र, नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

आमदार नीलेश लंकेंनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचा तयारी सुरू केली होती. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाला होता. तत्पूर्वी त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन, मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविषयी तक्रार केली होती. ही तक्रार पुढे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. परंतु त्यावर तोडगा निघाला नाही.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्यानंतर आमदार लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम भूमिका घेतली. आमदार लंके राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असल्याने त्यांच्या आमदारकीचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. कायदेशीर अडचणीतून मार्ग निघेपर्यंत आमदार लंकेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी भूमिका गुलदस्तातच ठेवली. मात्र, आज आमदार लंकेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

आमदार नीलेश लंके यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांना ‘लक्ष्य’ करत चौफेर टीका केली. अहंकाराचा नाशच होता, असे म्हणत आमदार लंकेंनी खासदार विखेंचे सर्वच काही काढले. साकळाई, ताजनापूर पाणी योजना कशी बारगळी. त्यावर यांचे कसे राजकारण सुरू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निमित्ताने अमित शाह यांची भेट घेतली.

यानंतर माध्यमांमध्ये घाईघाईने दिलेली माहिती शेतकरी विसरलेले नाहीत. दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करणारी औलाद नाही, असे म्हणून दलित सुधारणा योजनेचे मंजूर कामांचे श्रेयसुद्धा यांनी घेतले. यासाठी कसे राजकारण केले जाते, याचे दाखले आमदार लंकेंनी या वेळी दिले. शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून लोकसभेत काम करता. एकदा तरी लोकसभेत शेतकऱ्यांविषयी भाषण केले आहे का? असा प्रश्न लंकेंनी या वेळी उपस्थित केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दडपशाही आणि दादागिरी पलीकडे यांनी काही केले नाही. त्याला भीक घालणार नाही. तुमचे चमचे आणि तु्म्हाला येत्या १३ तारखेला घरी पाठवणार. मी सामान्य कुटुंबातील आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले. मी पैसे नव्हे लाख मोलाची माणसं कमवली. त्यांच्याकडच्या पीएला पीए आहेत. लोकांसाठी मला काम करायचे आहे. मी कार्यकर्ताच राहणार. उद्याही कार्यकर्ता राहणार. ही निवडणूक पारनेरकरांच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे. नीलेश लंकेला दगाफटका झाल्यास, तर सर्वसामान्यांना राजकारणात कायमचे आळं बसेल, असेहीदेखील आमदार लंके यांनी या वेळी म्हटले.

आपलं दार म्हणजे, शनिशिंगणापूर…

माझ्याबरोबर बोलणाऱ्या ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. नीलेश लंकेंना ओळखणाऱ्या सर्वांच्याच बदल्या करा. हम मैं भी कुछ-कुछ दम है ना! परंतु या वेळी कम से कम दोन लाख.., अशी घोषणा नीलेश लंकेंनी केली. नीलेश लंकेंच्या स्वतःच्या छाताडावर वार सहन करू शकतो. परंतु कार्यकर्त्यांवर केलेले वार सहन करणार नाही. ही निवडणूक कोणत्याही पुढाऱ्याच्या हातातील नाही. जनतेने हाती घेतली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आता कार्यकर्त्यांनी पारनेरकरांच्या अस्तित्वासाठी स्वाभिमान बाजूला ठेवा मतदारांच्या दारात जा. चुकले असल्यास माफी मागा. ही निवडणूक पारनेरकरांच्या अस्तित्वाची असल्याने कोणी खिंडीत गाठू नका. सरपंचाला भेटण्यासाठी प्रोटोकाॅल असतो, पण माझ्याकडे नाही. आपलं दार म्हणजे, शनिशिंगणापूर.., असे सांगून ही निवडणूक लढायचीच, असे आमदार लंके यांनी सांगितले.

13 तारखेला कळेल डाॅन कोण आहे ते!

पुढचे लोक श्रीमंत आहे. हेलिकाॅप्टरने फिरणारे हे लोक आहे. साडेचार वर्षे दिसली नाहीत. या निवडणुकीत आता काहीही होईल, पण आपण मॅनेज होणार नाही. कार्यकर्तेदेखील मॅनेज होणार नाही. मैं हू डाॅन.., म्हणतात, त्यांना 13 तारखेला कळेल डाॅन कोण आहे ते! हे नगर दक्षिणचे खासदार. पंतप्रधान आले उत्तरेला. संरक्षणमंत्री आले उत्तरेला. शासन आपल्या दारी उत्तरेला. अमित शाह आले उत्तरेला. पशुसंवर्धनचे प्रदर्शन घेतले उत्तरेला. जिल्हा नियोजनचा निधी उत्तरेला. पाचशे कोटी निधी राहात्याला. पारनेरचे पत्र आल्यावर अधिकाऱ्यावर डाफरायचे, असे कोठे होत असते का? असे म्हणून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढायची आणि जिंकायचीच, असे आमदार लंके यांनी सांगितले.