अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामांमुळे आणि अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध झाले आहेत. भाजपमधूनच नाही तर विरोधी पक्षांकडून जाहीरपणे त्यांच्या कामांचे कौतूक केले जाते. यामुळेच महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. आता नितीन गडकरी यांना भाजपकडून नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. ते 27 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. निवडणुकीची अनोखी रणनीती त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रचाराच्या या रणधुमाळीत नितीन गडकरी यांनी वेगळा किस्सा सांगितला. नागपूरच्या लोकांकडून अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाही. कारण हा रोड नितीन गडकरी यांनी बनवला आहे.

काय होता तो प्रकार

अरुणाचलमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागपूरच्या लोकांनी नितीन गडकरी यांना त्या ठिकाणी आलेले अनुभव सांगितले होते. त्याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, नागपूरमधून आल्याचे सांगितल्यावर त्या टॅक्सीवाल्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. कारण दुर्गम भागातील हा रस्ता स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झाला नव्हता. परंतु नागपूरकर असलेल्या नितीन गडकरी यांनी हा रस्ता करुन दिला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

लोकसभा अध्यक्षांनी मला फोन करून लोकसभेत बोलवले होते. लोकसभेत विरोधी पक्षांच्या 75 खासदारांनी आपली प्रशंसा केली होती. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, औवेसी होते. या सर्वांनी माझे आभार मानले. मी त्यांच्या मतदारसंघात सुध्दा काम केलीत होती. मला काही काँग्रेसचे लोक भेटली. माझे काम बोलत आहे, हे यामुळे दिसत आहे.

निवडणुकीची रणनीती सांगितली

प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान झाल पाहिजे, असे आपले धोरण लोकसभा अध्यक्षांनी मला फोन करून लोकसभेत बोलवले होते. लोकसभेत विरोधी पक्षांच्या 75 खासदारांनी आपली प्रशंसा केली होती. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, औवेसी होते. या सर्वांनी माझे आभार मानले. मी त्यांच्या मतदारसंघात सुध्दा काम केलीत होती. मला काही काँग्रेसचे लोक भेटली. माझे काम बोलत आहे, हे यामुळे दिसत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

निवडणुकीची रणनीती सांगितली

प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान झाल पाहिजे, असे आपले धोरण असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, कुठलीच निवडणूक मॅनेजमेंट मी करणार नाही. जेवायला असणार पण पिण्यासाठी नसणार आहे. त्यानंतर 5 लाखांच्या मतांनी आपण निवडून येणार आहे. याची मला गॅरंटी आहे. आता 27 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी बस, टॅक्सी काहीच मी देणार नाही. माझा फॉर्म भरायला किती लोक येतात मला पहायच आहे.

नागपुरात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

गेल्या 10 वर्षांत नागपूरात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. ही फक्त रील आहे खरा सिनेमा अजून बाकी आहे, असे गडकरी यांनी सांगितले. मला माझ्या मुलाला राजकारणात आणण्याची चिंता नाही. मी मुलांना सांगितलंय, माझ्या जीवावर राजकारणात यायच नाही. राजकारणात यायच असेल तर भिंतींवर पोस्टर लावण्यापासून कामे करावी लागणार आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता