महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने फोडल्याचा नेहमीच आरोप होतो. या आरोपांवर आता प्रथमच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री बनवायचंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष मुलांच्या मोहापायी फुटल्याचं विधान अमित शाह यांनी केले आहे.त्यांच्या या विधानाची चर्चा राजकारणात सुरु आहे.






इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये आज गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी हे मोठं विधान केले आहे. ”आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. पण ठाकरेंच्या पक्षातील कोणताच नेता आदित्य ठाकरेंना नेता म्हणून स्विकारायला तयार नाही आहे. शरद पवारांना देखील सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचंय. पण त्यांच्या पक्षातील नेत्यांना ही गोष्ट पटलेली नाही. म्हणून अनेक नेते पक्षातून निघून गेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षाला फोडले नाही तर ठाकरे आणि पवारांचा पक्ष त्यांच्या मुलांच्या मोहापायी फुटला आहे, असे मोठं विधान अमित शाह यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय. पण बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेत काम करणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्विकारलं तिथपर्यंत ठीक होतं. पण आता आदित्य ठाकरेंनाही स्विकारावं लागेल. ही गोष्ट अनेक नेत्यांना मान्य नव्हती. म्हणुनच त्यांच्या पक्षातील अनेक नेते बाहेर पडल्याचे अमित शाह यांनी सांगितले. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचंय. पण त्यांच्या पक्षातील नेत्यांना ही गोष्ट पटलेली नव्हती. म्हणून अनेक नेते पक्षातून बाहेर पडले. आम्ही कोणत्याही पक्षाला फोडले नाही तर ठाकरे आणि पवारांचा पक्ष त्यांच्या मुलांच्या मोहापायी फुटला आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत बोलायचं झालं तर, महायुतीचं जागावाटप नावांसह झालं आहे. कोणतेही वाद नाही आहे. आणि वाद टाळण्यासाठी इंडिया आघाडी (मविआ) जागावाटप करत नसेल, तर त्यांनी लवकर करावं, कारण आता इथून काहीच मिळणार नाही आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.











