गुहागर दि. १२ (अधिराज्य) तथागत बुद्धाने सत्य, शांती, मानवता, अहिंसा, शील, प्रज्ञा, करुणा, दया, क्षमा ही मूल्ये व समता, स्वातंत्र्य, न्याय ही तत्व देऊन मानवी दुःखाचा समूळ नाश करून जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग दिला त्याच धम्म शिक्षणाचा प्रचार, प्रसार करून सर्वांना त्याचा लाभ घेता यावा यास्तव बौद्धजन सहकारी संघाच्या विद्यमाने प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पूज्य भन्ते धम्मरत्न बोधी (मुंबई), आदरणीय पूज्य भन्ते विमल बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर शिबीर रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानवळे, शृंगारतळी, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे प्रारंभ करण्यात आला.
सदर प्रसंगी संघाचे विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे (मुंबई), संघाचे अध्यक्ष राजेंद्र पांडुरंग जाधव (मुंबई), गावशाखा अध्यक्ष सुनिल जाधव, सरचिटणीस महेंद्र मोहिते, सहसचिव विश्वास मोहिते, कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम, संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे, चिटणीस मनोज पवार, माजी कार्याध्यक्ष रवींद्र मोहिते गुरुजी, विभाग क्रमांक ३चे विभाग अधिकारी मनोज गमरे, विभाग क्रमांक ६चे सहानंद पवार, विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते, उद्योजक भूषण पवार, दै. सार्वभौम राष्ट्र प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये भन्ते बुद्धरत्न बोधी, भन्ते धम्मरत्न बोधी, भन्ते संघरत्न बोधी, बोधीनंद, धम्मनंद, संघनंद तसेच अनेक उपासक, उपासिका सहभागी झाले होते, निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरणात सदर शिबिर आयोजित करण्यात आल्याने सर्वांमध्ये एक वेगळाच उमंग व आनंद ओसंडून वाहत होता. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवर दानशूर व्यक्तींनी धम्मदान करून हातभार लावला त्या सर्वांना पूज्य भन्तेंच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सरतेशेवटी संघाचे सरचिटणीस महेंद्र मोहिते व चिटणीस मनोज पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.