राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती पण खासदारकी कुठे अडकलीये? मोदींना याची भीती वाटतेय का?

0

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला, पण ते लोकसभेत कधी परतणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही विधान केलं. “बघुयात राहुल गांधींचे संसद सदस्यत्व किती दिवसांत बहाल होते ते”. काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला आहे आणि सातत्याने प्रश्न विचारत आहे, तसेच केंद्र सरकारवर या प्रकरणात विनाकारण दिरंगाई केल्याचा आरोपही काँग्रेसकडून केला जातोय, पण नेमकं अडलं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

राहुल गांधी लोकसभेत कधी पोहोचणार?
सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली. काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला, पण मुद्दा हाच आहे की, राहुल गांधी लोकसभेत कधी दिसणार? संसद सदस्यत्व कधी बहाल केले जाणार? म्हणजेच काँग्रेस नेते राहुल गांधींना पुन्हा खासदार म्हणून सभागृहात कधी पोहोचणार? कारण मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. त्यावर चर्चा करण्याची संधी राहुल गांधींना मिळू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. प्रस्तावावर चर्चा 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

राहुल गांधींच्या खासदारकीचं कुठे अडलंय घोडं?
पण, राहुल गांधींचा संसदेत जाण्याचा मार्ग तितकासा सोपा दिसत नाही. राहुल गांधींनी लवकर सभागृहात परतावे, अशी नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीचीही इच्छा आहे. यासाठी काँग्रेस खूप प्रयत्न करत आहे, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजप आणि केंद्र सरकार म्हणजेच सत्ताधारी पक्ष या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

होण्याची आशा आहे. कारण राहुल गांधी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सभागृहात परतावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु अलिकडील इतर सदस्यत्वाच्या प्रकरणांचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते नाही की कोणत्याही खासदार किंवा आमदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर सदस्यत्व लगेच बहाल केले गेले.

कालकाचे आमदार प्रदीप चौधरी
उदाहरणार्थ, हरियाणातील कालका विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार प्रदीप चौधरी यांना हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील न्यायालयाने 28जानेवारी 2021 तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्यांना 2011 मध्ये हिमाचल प्रदेशातील बड्डी चौकात अडवून एका तरुणाच्या मृत्यूनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. 30 जानेवारी 2021 रोजी त्यांचे हरियाणा विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या प्रकरणात, 19 एप्रिल 2021 रोजी, उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली, परंतु जवळपास एक महिन्यानंतर, 20 मे 2021 रोजी त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते.

मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार
यासोबतच लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण ताजे आहे. फैजल यांना खासदारकी बहाल होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. 11 जानेवारी 2023 रोजी लक्षद्वीपमधील न्यायालयाने राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

25 जानेवारी 2023 रोजी केरळ उच्च न्यायालयाने दहा वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर त्यांची संसद सदस्यत्व परत दिलं जाणार होते, परंतु तसे झाले नाही. यानंतर, कायदा मंत्रालयाकडून लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्याची शिफारसही करण्यात आली होती. नंतर 29 मार्च 2023 रोजी दीर्घ प्रतीक्षेनंतर फैजल यांना खासदारकी बहाल करण्यात आली.

या दोन्ही प्रकरणांवर नजर टाकली तर आमदार-खासदार दोषी सिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांत त्यांचे सदस्यत्व तात्काळ संपुष्टात आले, पण संसद किंवा विधानसभेचे सदस्यत्व बहाल करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. अशा स्थितीत येत्या सोमवारी राहुल गांधी यांचे सदस्यत्व बहाल होईल, अशी आशा कमी आहे.

राहुल गांधींना कधी बहाल होणार खासदारकी?
आता पुन्हा राहुल गांधींच्या प्रकरण समजून घेऊयात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेमध्येच हा मुद्दा उपस्थित केला होता आणि राहुल गांधी यांचे सदस्यत्व कधी बहाल होते ते पाहूया. “जेव्हा सदस्यत्व काढून घ्यायचे होते, तेव्हा 24 तासात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाते, पण राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व बहाल करायला किती वेळ लागतो ते पाहू. आम्ही बघू आणि प्रतिक्षा करू, असे ते म्हणाले. ऑर्डर आणि त्याची प्रत सुरतपासून 1000-1200 किलोमीटर दूरवरून लगेच आली, सूचनाही लगेच आली. आता प्रकरण दिल्लीतच आहे. सर्वोच्च न्यायालयापासून काही किलोमीटरचे अंतर आहे, बघुयात हे अंतर कधीपर्यंत गाठतात?”

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. याआधीच राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच राहुल गांधी संसदेत परत यावेत यासाठी काँग्रेसने पूर्ण जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत हजर राहावे आणि 8 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अविश्वास प्रस्तावात सहभागी व्हावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे, परंतु वादाचा खेळ सुरूच आहे. कारण राहुल गांधींना आजपर्यंत सदस्यत्व परत मिळालेले नाही.

मोदींना भीती वाटतेय का?
महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणावर ट्विट करत भाष्य केले आहे. “23 मार्च रोजी सुरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी करार दिल्यानंतर 26 तासातच त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता दोष सिद्धीवर न्यायालयाद्वारे रोख लागून २६ तास उलटूनही अद्याप राहुलजींना त्यांचे संसद सदस्यत्व अद्याप बहाल का करण्यात आले नाही? पंतप्रधानांना अविश्वास प्रस्तावात त्यांच्या सहभागी होण्याची भीती वाटतेय का?”, असा सवाल काँग्रेसने पंतप्रधान मोदींना केला आहे.