शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी जवान चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. टीझरनंतर नुकताच किंग खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रिव्ह्यू ट्रेलरमध्ये बरेच अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. जवान चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय यात एक मराठमोळी अभिनेत्री देखील आहे. या प्रिव्ह्यू ट्रेलरमध्ये एक मराठमोळी अभिनोत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा डॅशिंग अवतार पाहून मराठी चाहते अवाक झाले आहेत.






जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची झलक दिसली. या प्रीव्यूमध्ये गिरिजा ही फूलटू अॅक्शन मोडमध्ये दिसली होती. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये दिसले की, गिरिजाच्या हातात बंदुक आहे आणि ती फायरिंग करत आहे.
गिरिजा ओकनं जवान चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘We are good to go, Chief!’. गिरिजाला अनेक जण सध्या तिच्या जवान या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
जवान चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.











