इच्छुकांचा आग्रह कामी थेट दिल्लीत चर्चा सुरू; भाजपचे पुन्हा धक्कातंत्र ‘या’ मंत्र्यांना नारळ?

0

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सहभागी करून घेतले असले, तरी जवळपास आठवडा लोटला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. खातेवाटपाची यादी आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारावर थेट दिल्लीत चर्चा सुरू असल्याचे समजते. या आठवड्यातच खातेवाटप आणि विस्तार होणार असून, भाजपचे दिल्लीतील नेतृत्व या वेळीही एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. विस्तारामध्ये भाजपच्या सध्याच्या चार मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पाडून अजित पवार गेल्या रविवारी राज्यातील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर या मंत्र्यांचे खातेवाटप तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते जवळपास आठवडाभर रखडले आहे. खातेवाटपावर थेट दिल्लीत चर्चा होत असल्यानेच विलंब झाल्याचे कळते. राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असून, त्यासाठी मंत्रीमंडळाचा विस्तारही करावयाचा आहे. भाजप तसेच शिवसेनेमधील इच्छुकांकडून फारच आग्रह धरला जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आल्याचे कळते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दोन दिवसांत निर्णय?
भाजपच्या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांकडून अपेक्षित कारभार होत नाही, अशा मंत्र्यांना विस्तारामध्ये वगळण्याचा केंद्रातील नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. याशिवाय भाजपमधील इतरांना अधिकाधिक संधी देण्याचाही यामागे विचार असल्याचे कळते. ज्यांना डच्चू मिळणार आहे, त्यामध्ये मुंबईतील एक, उत्तर महाराष्ट्रातील एक, पश्चिम महाराष्ट्रातील दोन मंत्र्याचा समोश असल्याचे कळते. डच्चू दिल्याने पक्षाच्या प्रतिमेत सुधारणा होईल की नाही याचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

विस्तार व खातेवाटपही

खातेवाटपासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तारही याच आठवड्यात होणार आहे. शिल्लक कॅबिनेट मंत्रिपदे व राज्य मंत्रिपदेही जाहीर करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘ते’ चार मंत्री कोण?
मुंबईतील एक, उत्तर महाराष्ट्रातील एक, पश्चिम महाराष्ट्रातील दोन मंत्री अशा भाजपमधील चौघांना वगळण्यात येणार असल्याचे समजते.