‘भाजपचे निष्ठांवत सतरंजीखाली अन् बाजार मुंणगे… शिंदे-फडणवीस-दादा ठाकरेंच्या टार्गेटवर !

0

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या बदललेल्या समिकरणांवरून भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना तसंच अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यवतमाळ-वाशीममध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘भाजपमधील निष्ठांवत सतरंजीखाली सापडत आहेत का बघा, बाजार मुंणगे पक्षात येत आहेत, त्यांच्या सतरंज्या निष्ठांवत अंध भक्त उचलत आहेत,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘भुजबळ आधी तिकडे होते, मग इकडे आले आता तिकडे गेले. तुम्ही मत कुणालाही द्या, सरकार माझंच येणार. पूर्वी मतपेटीतून सरकार येत होतं, आता खोक्यातून सरकार येतं. माझं सरकार वाईट असेल तर जनता खाली खेचेल, आपले 40 आणि अपक्ष आमदार सोडून गेले, तरीही राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?,’ असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

‘शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, पण दुसऱ्यांचं घर फोडता हा नालायकपणा भाजप करत आहे. कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. राज्यात एक फूल दोन हाफ आहेत. एक पूर्ण मुख्यमंत्री आहे तोही पूर्ण आहे का माहिती नाही. दोन हाफ उपमुख्यमंत्री आहेत. आमचं तीन चाकांचं सरकार होतं, आता तुमचं त्रिशूळ सरकार झालं का?’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळून दाखवला, तुम्ही दारोदारी फिरून देखील महाराष्ट्र सांभाळू शकत नाही. मी नेतृत्व करायचं का नाही हे जनता ठरवेल, मोदी-शाह ठरवणार नाहीत. सत्तेतल्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे, माझ्याकडे नाही. मोदींचं नाव आता चालत नाही, कर्नाटकमध्ये मोदींनी हनुमानाचं नाव घेतलं, लोकांनी गदा त्यांच्याच डोक्यात घातली,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे