तरुणाईची यूट्यूबकडे पाठ; इन्स्टाग्राम रिल्सच्या मोहात मनोरंजनाकडेच कल

0

तरुणाईच्या हातातील मोबाईलवर सर्वांत जास्त स्क्रीन टाइम इन्स्टाग्राम रिल्ससाठी दिला जात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियातील इतर माध्यमांपेक्षा इन्स्टालाच जास्त पसंती दिली जात असून, त्यानंतर फेसबुकचा वापर प्रभावीपणे होत असल्याचे निष्कर्ष समोर येत आहेत. ६६.६० टक्के तरूण इन्स्टाग्राम वापरतात तर ३३.४० टक्के तरूण यु-ट्यूबला पसंती देतात.

अलीकडील काळात सोशल मीडिया हे प्रभावी बनले आहे. जगभरात इन्स्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या १.३५ कोटींवर जाऊन पोचली आहे. दिवसभरातील २४ तासांमध्ये भारतामध्ये ६० लाखांहून अधिक रिल्स समाजमाध्यमांवर अपलोड केल्या जातात, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

कोरोनाच्या काळात युवकांकडून मोबाईलचा अतिवापर झाला. याच काळात रिल्ससारखा प्रकार अधिक प्रकर्षाने पुढे आला. पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यांचे रिल्स लाइक्स वाढण्यासाठी होताना दिसतात. काहींनी ते उत्पन्नाचे साधनच बनवून टाकले आहे. रिल्सवर असलेले ओळीला अनेकजण पसंती देतात.

बहुतांश तरूण फक्त रिल्स पाहण्यासाठीचा मोबाईलचा वापर करतात. मोबाईल अनलॉक केल्यानंतर लगेच रिल्स पाहणाऱ्याचे प्रमाण तब्बल ८६. ५० टक्के आहे. त्यामुळे तरूणाईला रिल्सचे व्यसनच लागल्याचे दिसून येते. एकएकटे रिल्स पाहण्याचे प्रमाण ७६. २० टक्के आहे. मित्र-मैत्रिणीसोबत १५.९० टक्के तर ठराविक लोकांसोबत (कुटुंबिय) ७.९० टक्के तरूण रिल्स पाहतात. रिल्स बनवताना म्युझिकलाही तेवढेच महत्व दिले जाते.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

त्यामुळे म्युझिक असलेल्या रिल्स तरूणाई सर्वाधिक पसंती देते. म्युझिक असलेल्या रिल्सला ७३ टक्के तरूण पसंती देतात. म्युझिक नसलेल्या रिल्सला ११.१० टक्के तर कधी-कधी म्युझिकच्या रिल्सला महत्व देणारे १५.९० टक्के तरूण पसंती देतात. एकसारख्या रिल्स पाहणाऱ्या तरूणाईचे प्रमाण ७९.४० टक्के आहे तर २०. ६० टक्के तरूण वेगवेगळ्या विषयांवरील रिल्स पसंती दिली जाते.

वर्षनिहाय लेखाजोखा

२०१९ – १५५,४३०,०००

२०२० – ८०,५९०,०००

२०२१ – १४४,०८०,०००

२०२२ – २५३,३३५,०००

२०२३ – ३२४,०००,०००

रिल्समध्ये काय?

माहितीपूर्ण रिल्स- ४७.६०

प्रेरणादायी रिल्स – १९.८०

माहितीपुर्ण रिल्स -४७.६०

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

पाहण्याची ठिकाणे

घर – ४७.६० टक्के

कुठेही – ५०.८० टक्के

महाविद्यालय – १.६० टक्के