राज्यातील १३ ऐतिहासिक गावांमधील १३ शाळांचा होणार कायापालट होणार आहे. वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. महापुरुषांशी संबंधित १३ शाळांच्या विकासासाठी तब्बल १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या योजनेत अहमदनगरच्या चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेचा समावेश अणार आहे.
यासोबतच अमरावतीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबागाडगेबाबा शाळा, अमरावती येथील शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख शाळेचाही कायापालट होणार. यासोबतच कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज आणि नाशिकमधील कुसुमाग्रजांची शाळा पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा विकास सरकार करणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरीतील महर्षी धोंडो केशव कर्वे व साने गुरुजी शाळा, सांगलीतील लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतिसिंह नाना पाटील शाळांचा चेहरामोहरा देखील बदलणार आहे. तसेच साताऱ्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले शाळांसाठी देखील सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.