राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान शरद पवार काय भूमिका घेतली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.






या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्यासाठी हे नवीन नाही. मोदी म्हणतात राष्ट्रवादी भ्रष्ट झालेला पक्ष मात्र त्याच राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी सत्तेत घेतले. आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. महाराष्ट्रातील जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत. ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्यापैकी ३-४ जण सोडून सर्व पराभूत होतील, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांनी पक्षावर दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, “कुणाला काय दावा करायचा आहे त्यांनी करावा. मला काही फरक पडत नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका लोकांमध्ये जाऊन. त्यांना इतिहास नीट माहित नाही. राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला कसा. हा पक्ष नव्हता, आमच्या भूमिका आणि काँग्रेससोबत काही मतभेद होते त्यामुळे आम्ही हा पक्ष निर्माण केला. पहिला पक्ष कुणी नेला असेल पण त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला हे मला माहित नाही. पक्षाची भूमिका घेऊन कोण काय भूमिका घेत आम्हाला फरक पडत नाही आम्ही लोकांमध्ये जाऊ, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे अनेक आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यापैकी अनेकांना मंत्री करण्यात आले आहे. 2019 मध्येही अजित पवारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पहाटे शपथ घेतली. मात्र, शरद पवार सक्रिय झाल्यानंतर ते परत आले आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच वर्षे सरकार चालले.











