मुंबई : अजित पवारांनी आपल्या 35 आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे.






महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शपथ घेतलेल्या अन् इतर आमदारांमध्ये ‘ही’ कॉमन गोष्ट
राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यामध्ये ईडीच्या कारवाई ही कॉमन गोष्ट आहे. कारवाईच्या भीतीपोटीच या आमदारांनी सरकारसोबत हातमिळवणी केली असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार – जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा तसेच राज्य सहकारी बँक घोटाळा
छगन भुजबळ – एक साखर कारखाना आणि ५५ कोटींची जमीन ईडीनं २०१६ मध्ये जप्त केली होती. याप्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.
प्रफुल्ल पटेल – इक्बाल मिर्ची प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त
हसन मुश्रीफ – ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा
धनंजय मुंडे – आपल्याविरोधातही ईडीच्या कारवाईच्या हालचाली सुरु असल्याचं मुंडेंनी म्हटलं होतं.











