सुप्रियाताई, प्रफुल्लभाई यांची घोषणा; अजितदादा तातडीने गाडीत बसून न बोलताच निघून गेले!

0

राष्ट्रवादीच्या आजच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

माध्यमांनी अजित पवारांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी दादा बोलणार नाहीत, असे सांगत शरद पवारांनी चांगले केले. त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी होतील, असे म्हटले. तर अजित पवार माध्यमांशी न बोलताच तातडीने गाडीत बसून निघून गेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम दिल्लीत घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते, तर सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या. यामुळे या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे का आल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतू, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.