CBI ची IAS अनिल रामोड यांच्यावर छापेमारी; 8 लाख स्वीकारतानाच गाठलं 

0

पुण्यात महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने धाड टाकली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सविस्तर वृत्त लवकरच…..