शरद पवारांना धमकी- तुमचा लवकरच दाभोळकर होणार

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; खासदार सुप्रियाताई सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट...

0
2

मुंबई दि. ९ जून – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

आदरणीय शरद पवारसाहेब यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती