तरुण अभिनेता हर्षवर्धन कपूर त्याचा उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाची जाण असलेला हा अभिनेता त्याचा अभिनय कलाकृतीसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. हर्षवर्धनचा “भावेश जोशी” हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या सुपरहिट चित्रपटाला 5 वर्षे झाली आहेत.
हा चित्रपट विक्रमादित्य मोटवाने यांनी दिग्दर्शित केला होता आणि याची कथा उत्साहवर्धक होती. हर्षची व्यक्तिरेखा नक्कीच काहीतरी वेगळं दाखवून जाणारी होती. गुडी बॉय ते सुपरहिरो सारख्या भूमिका करणारा हा अभिनेता त्याचा चित्रपटासाठी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहिला.
या चित्रपटाची कथा सिकू या माणसाभोवती फिरते. कथानकाला अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्स मिळत राहतात या मुळे “भावेश जोशी’ हा सुपरमॅन आणि स्पायडरमॅनसारखाच खरा सुपरहिरो बनतो. सध्या हर्षवर्धन अभिनव बिंद्रावरील बायोपिकची तयारी करत आहे. हर्षला पहिल्यांदाच अश्या अनोख्या रोल मध्ये बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.