लहान मुलांचा सर्वागीण विकास अन् कलागुणांना वाव देण्यासाठी शिबिर: आयोजक पृथ्वीराज सुतार यांचे मत

0

पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) व बाल विकास केंद्र, नॉर्थ डहाणूकर कॉलनी यांच्या संयुक्त सहकार्याने कोथरूड परिसरातील ३ ते १५ वर्षाच्या वयोगटातील मुला – मुलीसाठी श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीराचे आयोजन दि. २०मे ते ३१मे या कालावधीमध्ये सायं ५ ते ७ या वेळेत करण्यात आले होते.

या कालावधीमध्ये मुला-मुलींसाठी नृत्य प्रशिक्षण, हस्तकला, मातीकाम, चित्रकला, संगीत, गायन, जादूचे प्रयोग, अॅक्टींग यांचे प्रशिक्षण देण्यात आले, या शिबीराचे आयोजन नॉर्थ डहाणूकर कॉलनीच्या मैदानावर करण्यात आले. रोज मुलांना खाऊ देण्यात आला, समारोपाच्या दिवशी सर्व मुलांना व पालकांना आईस्क्रिम देण्यात आले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

समारोपाच्या कार्यक्रमात शिबिराच्या काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील ५० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सदरची बक्षिसे शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या शुभहस्ते देण्यात आली.

आपल्या भाषणात पृथ्वीराज सुतार यांनी या शिबिराचे आयोजन करण्याचा उद्देश हा लहान मुलांची मानसिक व शारिरिक वाढ व्हावी, सर्वागीण विकास व्हावा, मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिराचे १८ वे वर्ष असून, दरवर्षी साधारण साडेतीनशे ते चारशे मुले-मुली यामध्ये सहभागी होती. या शिबीरामुळे मुलांना नवीन मित्र मिळाले, त्यांच्या आवडीने खेळ खेळता आले.त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास या शिबिराची मदत झाली.या पुढे कोथरूडच्या विविध भागात या शिबिराचे आयोजन करावे तसेच पालकांसाठी सुध्दा अशा संस्कार शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी सर्व पालकांनी केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या कार्यक्रमास नॉर्थ डहाणूकर कॉलनी फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. दिपालीताई पाठक, सेक्रेटरी राहुल यादव, सभासद यशवंत बुचके, बालविकास केंद्राच्या संचालिका अपर्णाताई वेर्णेकर, स्मिताताई वाळीबे, राजेश्वरीताई यादव हे उपस्थित होते. या कार्यक्रमास राजेश्वरीताई यादव, श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर वघरडे हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत बोहुडे, नचिकेत घुमटकर, विशाल उभे, जितेंद्र खुंटे, योगेश चौधरी, चेतन डेरे,योगेश क्षीरसागर, सुंदर खुंडे, प्रशांत पाटील, अभिजीत चव्हाण यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदाताई डेरे यांनी केले तर आभार राजेश्वरीताई यादव यांनी मानले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा