महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथे संपन्न. एक जून 2023 रोज हिंगणे होम कॉलनी सभागृहामध्ये समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने व सेवा सहयोग संस्थेच्या वतीने चॉकलेट बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरासाठी मीनाताई मोरे, अपूर्वा तांबे ,संगीता तांबे ,मंदाकिनी वनसाळे ,सुनीता उभे यांनी विशेष पुढाकार घेतला होता, शिबिरासाठी साधारण 50 ते 60 महिला उपस्थित होत्या
त्याचप्रमाणे स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने संचालिका सुप्रिया मॅडम यांनी स्त्रीमुक्ती संघटनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितली ,घरगुती भांडणे, महिलांच्यावर होणारे अत्याचार ,लहान मुलांच्यावर होणारे अत्याचार किंवा अनाथ,दिव्यांग मुलांचे संगोपन त्यांचे पुनर्वसन इत्यादी प्रकारची सामाजिक कार्य स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने करण्यात येतात असे त्यांनी या ठिकाणी नमूद केले, त्याचप्रमाणे समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद तांबे यांनी महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी महिलांसाठी ,मुलींसाठी अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरे समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यकाळात विनामूल्य घेण्यात येतील असं यावेळी सांगितलं